आमच्याविषयी

ग्रामपंचायत वाडीपीर




आपले सहर्ष स्वागत करते. वाडीपीर हे करवीर तालुक्यातील एक लहानसे पण ऐतिहासिक महत्त्व असलेले गाव आहे. गावाचे नाव येथील प्राचीन पीर/दर्गा परंपरेशी जोडलेले असून, सर्वधर्मीय ऐक्याची परंपरा येथे दिसून येते. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून भात, ऊस व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा व मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. परंपरा जपत प्रगतीकडे वाटचाल करणारे, शांत व सलोख्याचे हे गाव आहे..


सण-उत्सव व उरूस उत्साहात साजरे केले जातात, ज्यामुळे सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. कोल्हापूर शहराच्या जवळ असल्याने शिक्षण, आरोग्य व बाजारपेठेच्या सुविधा सहज उपलब्ध होतात.


  • गावातील 100% विधवा महिलांना विधवा सन्मान योजनेचा लाभ मिळाला आहे. हे आपल्या गावचे नावीन्यपूर्ण काम आहे
  • महिला सभा
  • प्लास्टिक बंदी जनजागृती करणे करिता दुकानदारांना नोटीस लागू करतेवेळीचे आहेत